नमुना क्र.१
संगणक चित्राकृती चार पद्धतींनी तयार होते, एकमिती (स्तंभलेखन), द्विमिती (द्विमिती स्थिर चित्र), त्रिमिती (त्रिमिती स्थिर चित्र) व चलचित्रण (ऍनिमेशन), ह्याचे पोट-विभाग - १ - संगणकाचा उपयोग करून अस्तित्वात असणार्या प्रतिमांचा वापर करून अपेक्षित चित्राकृती तयार करणे (एकमिती, द्विमिती अथवा त्रिमिती चित्रांद्वारे). २ - एखाद्या सहज सुचलेल्या कल्पनेची विचारपूर्वक, योजनाबद्ध स्थिरचित्राकृती निर्माण करणे. ३ - अस्तित्वात नसलेल्या वस्तूची योजनाबद्ध कल्पना करून एक नवीन प्रतिमा बनवून त्या पासून स्थिरचित्राकृती निर्माण करणे.
संगणक चित्रकारांचे दोन प्रकार असतात, हौशी आणि व्यवसायिक. हौशी संगणक चित्रकार शिक्षण घेण्यापासून ते एक अनुभवी संगणक चित्रकार म्हणून उमेदवारी करणारा असतो. तर व्यवसायी संगणक चित्रकार एक अनुभवी विश्वासपात्र व्यवसाय करणारा असतो. संगणक चित्राकृतीचा एक उमेदवार होण्याकरता संगणकाचे चित्राकृती संबंधित आवश्यक ज्ञान मिळवावे लागते. चित्राकृतीचे दोन मुख्य प्रकार आहेत,
१) चित्रपेशी आकृती (बिटमॅप इमेज) व २) सदिशाकृती (व्हेक्टर इमेज).
१) चित्रपेशी आकृती (बिटमॅप इमेज) व २) सदिशाकृती (व्हेक्टर इमेज).
नमुनाक्र.३-प्रतिमाग्राहकाने(कॅमेर्याने) ग्रहण केलेल्या प्रतिमेचे लेखांकन चित्रपेशी आकृती पद्धतीचे असते, कोणत्याही चित्रपेशी आकृतीचे मूळ आकार कमी केल्यास, त्याच प्रमाणात चित्रपेशींचा आकार घटत असल्याने दर्जा बिघडत नाही, परंतू मूळ आकार वाढवण्याचा प्रयत्न केल्यास चित्राकृतीचा दर्जा बिघडतो, कारण प्रत्येक चित्रपेशीचा आकार वाढल्याने सुटी सुटी दिसू लागते. रंगाचे एकमेकांत मिसळणे फार चांगल्या पद्धतीने फक्त चित्रपेशी आकृतीतूनच दाखवता येते.
नमुना क्र.४ - सदिशाकृतीचा ( व्हेक्टर इमेज ) आकार लहान-मोठे करण्याचे मुळीच बंधन नाही, मूळ आकाराच्या ९० टक्के लहान आकार ते ६००० टक्के मोठा आकार सहज बदलता येतो, सदिशाकृतीचा दर्जा बिघडत नाही. परंतु रंगांची एकमेकांत मिसळ करणे फार त्रासाचे असते.
नमुना क्र.५ - चित्रपेशी आकृतीचा व सदिशाकृतीचा फरक ह्या दोन चित्रातून दाखवला आहे. मुळातच चित्रपेशिचा आकार चौकोनी / आयाताकृती असतो त्यामुळे कोणत्याही चित्रपेशी आकृतीच्या कडा एकसंध रेषेत न दिसता करंजी सारखे कोपरे असलेली दिसते. हे कोपरे सदिशाकृती चित्रात दिसत नाहीत.
चित्रपेशी आकृती संपादक ( बिटमॅप इमेज एडिटर ) व सदिशाकृती संपादक ( व्हेक्टर इमेज एडिटर ) असे दोन संपादक ( एडिटर ) प्रकार आहेत, ह्या दोन्ही प्रकारांचे उपायोजन अवजार संच ( ऍप्लिकेशन टूल्स ) शिकणे अत्यावश्यक असते. विविध प्रकारची कामे हाताळल्याने ह्या संपादनाचे प्रभूत्व मिळवणे शक्य असते. चित्रपेशी आकृती संपादकाचे ( बिटमॅप इमेज एडिटर ) दोन प्रसिद्ध उपायोजन अवजार संच आहेत फोटोशॉप व जिम्प. सदिशाकृती संपादक ( व्हेक्टर इमेज एडिटर ) चे कोरलड्रॉ, इलस्ट्रेटर, इनडिझाइन असे प्रसिद्ध उपायोजन अवजार संच आहेत हे संच वर्ष सहा महिन्यात बाजारात नवीन आवृत्ती आणून विकले जातात.
संगणक चित्राकृती व्यावसायिकाला संगणक चित्राकृती विषयाची माहिती असण्याचा खूप फायदा होतो, परंतु पारंपारिक चित्रकार असण्याची आवश्यकता नसते. अनुभवी चित्रकार उमेदवारांना काम देऊन हा व्यवसाय सांभाळणे सहज शक्य आहे.
लेखक: विनायक रानडे
अधिक माहिती संपर्क - व्हीके - v.k9121@gmail.com
व्ही ए पी कला तंत्र - http://skillsvap.blogspot.com
Skype user VKR (skillsvk)
श्री विनायक रानडे ह्या विषयात १९९५ पासून कार्यरत आहेत. दोन वर्ष केंब्रिज अभ्यासक्रमाच्या १०वी, ए एस, ए लेव्हल प्रशिक्षणात संगणक चित्राकृती शिक्षक ( CIE, X, AS, A level Computer Graphics Teacher ) म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
Print Page
३ टिप्पण्या:
असं सर्व पेंटब्रशमधे सुद्धा करता येईल का? की त्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर वापरावं लागतं?
बरिच निरनिराळी चित्रपेशी आकृती संपादकाचे(बिटमॅप इमेज एडिटर) बाजारात आहेत प्रत्येकाचे वैशिष्ठ्य आहे. पण फोटोशॉप सगळ्यात चांगले आहे.
छान. तुम्हांला प्रश्न विचारून पिडायला छान विषय मिळाला. तेव्हां ब्रश परजून तैयार राहा.
सुधीर कांदळकर.
टिप्पणी पोस्ट करा