दिवाळी वर्षातनं एकदाच येते आणि त्यासोबत येत असतो दिवाळी अंक.... मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. छापील दिवाळी अंकांबरोबर आता तितक्याच तोडीचे महाजालीय दिवाळी अंक देखिल निर्माण होत आहेत. महाजालाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर बहुदा ’मायबोली’ ह्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक हा सर्वप्रथम दिवाळी अंक ठरावा. त्यानंतर मग हळूहळू मनोगत,उपक्रम सारख्या संकेतस्थळांनीही ही परंपरा पुढे वाढवली. आता तर बहुसंख्य नामांकित वृत्तपत्रांचेही महाजालीय दिवाळी अंक निघायला लागलेत.
त्याच धर्तीवर आम्ही घेऊन येत आहोत...हिवाळी अंक. ही एक अभिनव कल्पना आहे आणि बहुधा मराठी साहित्याच्या जगतात हा पहिलाच अंक ठरावा असा अंदाज आहे. हिवाळ्यात प्रकाशित करत आहोत म्हणून आणि दिवाळी शब्दाशी यमक जुळतंय म्हणून...अशा दोन्ही अर्थाने हा प्रकार आम्ही निश्चित केलाय. आता अंक म्हटला की त्याला नाव हे हवेच..त्या न्यायाने "शब्दगाऽऽरवा" हे नाव आम्ही ह्या अंकासाठी योजलेले आहे.(अर्थात त्यानंतर तुम्ही वाचक देखिल ’नावं’ ठेवायला मोकळे आहात म्हणा! ;) ) ह्या शब्दाचा सरळ असा अर्थ कुणालाही कळण्यासारखा आहे. मात्र त्यातला लपलेला अर्थ असा आहे.... ह्या अंकातील ’शब्द’ वाचून वाचक ’गाऽऽर’ पडेल आणि मग उस्फुर्तपणे म्हणेल ’वा!’ :D
आमचे मित्र प्रशांत मनोहर ह्यांनी "शब्दगाऽऽरवा" चे नेमके केलेले वर्णन ह्या खालील ’हायकू’मध्ये वाचा.
हिवाळी अंक
पानोपानी साठला
शब्दगाऽऽरवा ॥
हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे साहित्यिकांकडून अपेक्षित असा मर्यादित प्रतिसाद मिळालाय. पण आम्हाला खात्री आहे की पुढील वर्षी अजून जास्त संख्येने लोक ह्यात सामील होतील. आम्हाला अशीही खात्री आहे की ह्या अंकातील बहुविध साहित्यकृती आपल्याला निश्चितपणे वाचनानंद देतील.
तेव्हा आता तुम्ही वाचा आणि सांगा कसा वाटतोय आमचा अंक!!!
कळावे,लोभ असू द्यावा.
आपला स्नेहांकित

१३ टिप्पण्या:
अंक सुरेखच आहे. लेखनाचा दर्जाही उत्तम आहे.
फक्त एक कमी वाटतेय....मुखपृष्ठावरील शब्दगाऽऽरवा हे शीर्षक थोडे छोटे हवंय.
धन्यवाद अनामिक.
आपली सुचना नोंदवून घेतलेय.
संपादक महाशय,अंक मस्तच आहे आणि ’हिवाळी अंक’ ही कल्पनाही नावीन्यपूर्ण आहे. काही लोक ह्या अंकाविरूद्ध वेडंवाकडं बोलत असले तरी त्यातून त्यांना होणारी जळजळच दिसतेय. तुम्ही त्यांच्याकडे दूर्लक्ष करा.
ह्या अंकात ज्यांचे ज्यांचे लेखन आहे त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.
मनोज
धन्यवाद मनोज.आपल्या प्रोत्साहनबद्दल मन:पूर्वक धन्यवाद
टीकात्मक आणि प्रशंसक,अशा दोन्ही पद्धतीच्या प्रतिसादांना आम्ही तितकाच मान देतो. काय चांगलं आहे,बरोबर आहे हे जसे प्रशंसेने कळतं तसंच काय वाईट आहे,काय चुकतंय हे टीकेने कळतं...ज्यामुळे भविष्यात काही सुधारणा करता येऊ शकते.
काका, हा हिवाळी अंक मस्तच जमलाय. पुढच्या वर्षी भरभरून प्रतिसाद मिळणार. माझ्या या अंकाला मन:पूर्वक शुभेच्छा!
हाती घेतलेले काम निर्धाराने तडीस नेल्याबद्दल तुमचे व तुमच्या टीमचे अभिनंदन. पुढील वर्षीच्या अंकासाठी शुभेच्छा.
देव बाप्पा !
बाकीचे सर्व लेख वाचले. फारच छान आहेत.
आता मार्च मधे उन्हाळी अंकाची तयारी सुरु करा.
मनःपुर्वक अभिनंदन !!
नाना
देवकाका,
अंक छानच झालंय. अगदी गोंडस. नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा :)
देवसाहेब,
अवलियासाहेबांच्या सूचनेला मन:पूर्वक अनुमोदन! खरंच उन्हाळी अंकाला सुरुवात करा. माझे पूर्ण सहकार्य सर्व बाबतीत (मागाल तसे) मिळेलच.
देव साहेब, सुरेख अंक झालाय. अहो, वेळ काढून लेखन जमा करणे,अंकाला आकार देणे,
सजावट करणे, अनेक गोष्टी सांभाळून अंक काढणे सोपे नाही.
अंक पाहता आपण घेतलेली मेहनत फळाला आली आहे...!
सर्व लेखक,कवींचे मन:पुर्वक अभिनंदन....!!!
कांचन,धम्मकलाडू,नानासाहेब,जयश्री,काळेसाहेब आणि दिलीपराव आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
उन्हाळी अंक? हाहाहा!
आधी हा तर वाचकांच्या पचनी पडू द्या. मग विचार करता येईल. :)
कवितांची सजावट लक्षणीय वाटली. चित्रांचें आणि कवितेचें नातें मनांत भरतें, अक्षरांचा आकार आणि शैली, चित्रांची आणि अक्षरांची रंगसंगती चित्रांना व कवितेला मस्त उठाव देणारी वाटली. पहिलीं दोन चित्रें - व्यथा व दुरावा तर जीवघेणीं आहेत.
झकास.
शब्दगाऽऽरवा : हिवाळी अंक - आंतरजालावर ही कल्पना नाविन्यपूर्ण, आणि विषयांची विविधता दोनही युक्त वाटले.
लेखनासोबत छपाई (print) करण्याची सोय उचित आहे. निदान माझ्यासारख्याना जे स्क्रीनवर वाचायचे टाळतात.
अन् कविता लहान असो कि लांब - ती निवांतपणे कागदावर वाचायची गोड़ी वेगळीच.
तसे पाहता आम्हाला सर्वच ऋतूंचे सारखेच कौतुक.
सृष्टी किती छान नाही! माझ्या आजीसाराखी ती पण कधी नेमाने गोल गोल फिरायला कंटाळत नाही. शिशिरानंतर वसंत येणार! वानसे किती नशीबवान. त्यांच्या आयुष्यांत सारे ऋतु नेमाने येतात. माणसांचे तसे नाही. साहित्याचे तसे काही व्हायला नको!
एक सूचना: विषय / लेखक यांच्या यादिबरोबर शिर्षकांची यादी जोडली जावी असे वाटले.
हिवाळी अंकाशी जोडलेल्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.
टिप्पणी पोस्ट करा