सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

काजवाकसा कातरवेळेला घुमे मनाचा पारवा
हवे आभाळ मुठीत, चंद्र ओंजळीत हवा

किलबिलणारी सांज, ओढ मनी कोटराची,
निळ्या नभाचे कोंदण, तसा पाखरांचा थवा

वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा

वेल जाईची सजली चांदण्यांच्या बहराने,
मस्त गंधाच्या धुंदीत निशिगंधाचा ताटवा

देव्हा-यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवाकवयित्री:क्रान्ति
Print Page

३ टिप्पण्या:

कांचन कराई म्हणाले...

वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा


हे आवडलं.

सुधीर कांदळकर म्हणाले...

अप्रतिम.

ओंजळीतला चंद्र आणि काजव्यानें मन उजळणॆं झकास.

सुधीर कांदळकर

दिलीप बिरुटे म्हणाले...

>>वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा


मलाही याच ओळी आवडल्या.