मंगळवार, १ डिसेंबर, २००९

महान फलंदाज - सुनील गावसकर


उभा राहण्याचा पवित्रा-सरळ पकडलेली बॅट

सुनील मनोहर गावसकर. जन्म-१०जुलै १९४९ . सरळ बॅटने खेळणारा सुनील हा भारताचा माजी संघनायक आणि जगातला सर्वात महान आघाडीचा फलंदाज आहे. त्याने वेस्ट-इंडीज विरुद्ध १९७०-७१ च्या दौर्यात पदार्पण केलं. ह्या पहिल्याच दौर्यात १५४. च्या सरासरीने त्याने ७७४ धावा कुटल्या.
ह्यात त्याच्या धावा अशा होत्या....
पोर्ट ऑफ स्पेन: ६५ आणि नाबाद ६७
जॉर्जटाऊन: ११६ आणि नाबाद ६४
ब्रिजटाऊन: १ आणि नाबाद ११७
पोर्ट ऑफ स्पेन: १२४ आणि २२०
त्यावेळी प्रतिस्पर्धी संघात होते हॉलफर्ड, होल्डर,शेफर्ड वगैरेंसारखे राक्षसी देहयष्टीचे जलदगती गोलंदाज आणि त्यांचा संघनायक होता जगातला अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू सर गारफील्ड सोबर्स. ह्या संघात हंट,कन्हाय,लॉईडसारखे नावाजलेले फलंदाज होते. अशा नाणावलेल्या खेळाडु असलेल्या संघाविरुद्ध त्यांच्याच देशात जाऊन पदार्पणातच असा पराक्रम केवळ गावसकरच करू जाणे. जेमतेम ५फूट ४इंच उंची असलेल्या गावसकरचा हा पराक्रम पाहून तिथले लोक त्याला आदरानेलिटिल मास्टरम्हणू लागले.पुढे सार्या क्रिकेट जगतानेही त्यावर शिक्कामोर्तब केले.


सुंदर लेग ग्लान्स

गावसकरच्या जन्माची कथाही गमतीदार आहे. त्याच्या जन्माच्या वेळी परिचारिकेने त्याला दुपट्यात गुंडाळून त्याच्या आईजवळ ठेवण्याऐवजी चुकून एका कोळणीजवळ ठेवले होते आणि त्या कोळणीचे मुल गावसकरच्या आईजवळ. पण गावसकरचे मामा आणि भारताचे माजी यष्टीरक्षक श्री. माधव मंत्री ह्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी वेळीच चूक सुधारली. नाहीतर......सुनील गावसकर नावाचा महान खेळाडु भारताला कुठून मिळता? कुठेतरी समुद्रावर मासेमारी करत बसला असता. :D


बॅकफुटवर जात मारलेला ऑफ ड्राईव्ह.

वेस्ट इंडीजविरुद्ध दमदार खेळ खेळणारा गावसकर इंग्लंडच्या १९७१ दौर्यात मात्र फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यात त्याने २४ च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह फक्त १४४ धावाच केल्या.
लॉर्डस्‌: ४ आणि ५३
मॅन्चेस्टर: ५७ आणि २४
ओव्हल: ६ आणि ०

१९७२-७३ मध्ये भारतामध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही पुन्हा गावसकर २४.८९ च्या सरासरीने दोन अर्ध शतकांसह फक्त २२४ धावाच करू शकला.
दिल्ली: १२ आणि ८
कलकत्ता: १८ आणि २
मद्रास: २० आणि नाबाद ०
कानपूर: ६९ आणि २४
मुंबई: ४ आणि ६७


१९७४ सालच्या इंग्लंड दौर्यात पुन्हा गावसकर अपयशी ठरला. २६.१७ च्या सरासरीने एक शतक आणि एका अर्धशतकासह फक्त २१७ धावाच करू शकला.
मॅन्चेस्टर: १०१ आणि ५८
लॉर्डस्‌: ४९ आणि ५
बर्मिंगहॅम: ० आणि ४

१९७४-७५ मध्ये वेस्ट-इंडीजविरूद्ध भारतात झालेल्या दोन सामन्यात मिळून गावसकर २७च्या सरासरीने फक्त १०८धावाच करू शकला ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
बंगलोर: १४ आणि ०
मुंबई: ८६ आणि ८


बहारदार ऑफ ड्राईव्ह

१९७५-७६ च्या न्युझीलंड आणि वेस्ट-इंडीजच्या दौर्यात गावसकरची बॅट पुन्हा एकदा तळपली.
न्युझीलंडविरूद्ध त्याने ६६.५० च्या सरासरीने २६६ धावा काढल्या;ज्यात त्याचे एक शतक आणि एक अर्धशतक होते.
ऑकलंड:११६ आणि नाबाद ३५
ख्राईस्टचर्च: २२ आणि ७१
वेलिंग्टन: २२

विंडीजविरूद्ध ५५.७१च्या सरासरीने त्याने ३९० धावा काढताना दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं.
ब्रिजटाऊन:३७ आणि १
पोर्ट ऑफ स्पेन: १५६
पोर्ट ऑफ स्पेन: २६ आणि १०२
किंग्स्टन:६६ आणि २


त्यानंतरच्या १९७६-७७च्या न्युझीलंड आणि इंग्लंडविरूद्ध भारतात झालेल्या लढतीत त्याचा सरासरीचा आलेख पुन्हा खाली उतरला.
न्युझीलंडविरूद्ध ४३.१७च्या सरासरीने त्याने २५९ धावा केल्या,त्या एका शतकाच्या साथीने.
मुंबई: ११९ आणि १४
कानपूर ६६ आणि १५
मद्रास: २ आणि ४३

इंग्लंडविरुद्ध ३९.४० च्या सरासरीने त्याने ३९४ धावा केल्या,त्या एक शतक आणि दोन अर्धशतकांसह.
दिल्ली : ३८ आणि ७१
कलकत्ता: ० आणि १८
मद्रास: ३९ आणि २४
बंगलोर: ४ आणि ५०
मुंबई: १०८ आणि ४२



पुढे सरसावत मारलेला कव्हरड्राईव्ह

त्यानंतर १९७७-७८च्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर त्याला पुन्हा एकदा सूर गवसला. ह्या दौर्यात त्याने ५०च्या सरासरीने ४५०धावा केल्या, ज्यात त्याने तीन शतकं झळकावली.
ब्रिस्बेन: ३ आणि ११३
पर्थ: ४ आणि १२७
मेलबर्न: ० आणि ११८
सिडनी : ४९
ऍडिलेड:७ आणि २९

त्यानंतरच्या १९७८-७९च्या पाकिस्तानच्या दौर्यावर तर त्याने कमालच केली. ८९.४० धावांच्या सरासरीने त्याने ४४७धावा फटकावल्या. ज्यात त्याची दोन शतकं आणि दोन अर्धशतकं होती.
फैसलाबाद: ८९ आणि नाबाद ८
लाहोर: ५ आणि ९७
कराची: १११ आणि १३७


ह्याच मोसमात(७८-७९) भारतात वेस्ट-इंडीजविरूद्ध त्याने अजूनच कमाल केली. ९१.५० च्या सरासरीने त्याने चक्क ७३२ धावा कुटल्या,त्याही चार शतकं आणि एक अर्धशतकांच्या मदतीने.
मुंबई: २०५ आणि ७३
बंगलोर: ०
कलकत्ता: १०७ आणि नाबाद १८२
मद्रास : ४ आणि १
दिल्ली: १२०
कानपूर: ४०



जोरदार हुकचा फटका.

१९७९च्या इंग्लंड दौर्यात गावसकरने आपल्या बॅटचा हिसका इंग्रजांना दाखवला. इथे त्याने ७७.४३ धावांच्या सरासरीने ५४२ धावा तडकावल्या. ज्यात त्याचे एक शतक आणि चार अर्धशतकं होती.
बर्मिंगहॅम: ६१ आणि ६८
लॉर्डस्‌: ४२ आणि ५९
लिडस्‌:७८
ओव्हल: १३ आणि २२१



मिडविकेटला उत्तुंग षटकार

१९७९-८०साली ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला. त्यांच्या विरुद्ध गावसकरने ५३.१२ च्या सरासरीने ४२५ धावा काढल्या. ज्यात त्याची दोन शतकं आणि दोन अर्धशतकं होती.
मद्रास: ५०
बंगलोर: १०
कानपूर: ७६ आणि १२
दिल्ली: ११५
कलकत्ता: १४ आणि २५
मुंबई: १२३


त्यानंतर आलेल्या पाकिस्तानच्या संघाविरुद्धही सुनीलची बॅट अशीच तळपली. ५२.९० च्या सरासरीने त्याने ५२९ धावा फटकावल्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
बंगलोर: ८८
दिल्ली: ३१ आणि २१
मुंबई: ४ आणि ४८
कानपूर: २ आणि ८१
मद्रास: १६६ आणि नाबाद २९
कलकत्ता: ४४ आणि १५




सणसणीत ऑनड्राईव्ह.
इथे डोक्यावर दिसतेय तेच ते खास शिरस्त्राण. वेस्ट इंडिजच्या ’माल्कम मार्शल’ ह्या द्रुतगती गोलंदाजाच्या शरीरवेधी मार्‍याविरुद्ध प्रत्युत्तर म्हणून मुद्दाम बनवून घेतलेले.

ह्यानंतर १९७९-८० साली भारतात इंग्लंडचा संघ आला. इथून गावसकरच्या धावांचा ओघ आटत गेला.
इंग्लंडविरूद्ध मुंबईत झालेल्या एकमेव सामन्यात त्याने ३६.५०च्या सरासरीने दोन्ही डावात मिळून फक्त ७३ धावाच(४९ आणि २४) काढल्या.

१९८०-८१च्या ऑस्ट्रेलिया न्युझीलंडच्या जोड दौर्यावर तर तो पार ढेपाळला.
ऑस्ट्रेलियात त्याने १९.६७च्या सरासरीने फक्त ११८ धावा काढल्या. ज्यात फक्त एकच अर्धशतक होते.
सिडनी: ० आणि १०
ऍडिलेड: २३ आणि ५
मेलबर्न: १० आणि ७०

तर न्युझीलंडमध्ये २१ च्या सरासरीने फक्त १२६ धावाच काढल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
वेलिंग्टन: २३ आणि १२
ख्राईस्टचर्च: ५३
ऑकलंड: ५ आणि ३३

१९८१-८२ साली इंग्लंड संघ भारतात आला असताना गावसकरला पुन्हा सूर सापडला आणि त्याने ६२.५० च्या सरासरीने ५०० धावा फटकावल्या. ह्यात शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई: ५५ आणि १४
बंगलोर: १७२
दिल्ली: ४६
कलकत्ता: ४२ आणि नाबाद ८३
मद्रास: २५ आणि ११
कानपूर: ५२

त्यानंतरच्या १९८२च्या इंग्लंड दौर्यात त्याची फलंदाजी पुन्हा एकदा तळाला गेली.
ह्या दौर्यावर त्याने २४.६७ च्या सरासरीने फक्त ७४ धावाच केल्या.
लॉर्डस्‌: ४८ आणि २४
मॅन्चेस्टर: २
ओव्हल:जखमी असल्यामुळे खेळू शकला नाही.

१९८२-८३ श्रीलंका संघाविरूद्ध मद्रास येथे झालेल्या एकमेव कसोटीत त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटीचे पाणी दाखवून दिले.
पहिल्या डावात १५५ धावा आणि दुसर्या डावात नाबाद धावा काढत त्याने १५९ ची सरासरी गाठली.

त्यानंतर झालेल्या सामन्यांमध्ये त्याच्या खेळाचा आलेख असाच कधी खाली तर कधी वर होत गेला.

१९८२-८३ पाकिस्तानविरूद्ध-पाकिस्तानमध्ये.
एकूण धावा: ४३४ ; सरासरी: ४८.२२ ; शतक: १ ; अर्धशतक: ३

१९८२-८३ वेस्ट-इंडिजविरूद्ध-वेस्ट इंडिजमध्ये.
एकूण धावा: २४० ; सरासरी: ३० ; शतक: १

१९८३-८४ पाकिस्तानविरूद्ध-भारतामध्ये.
एकूण धावा: २६४ ; सरासरी: ६६ ; शतकं: १ ; अर्धशतकं: २

१९८३-८४ वेस्ट-इंडिजविरूद्ध-भारतात.
एकूण धावा: ५०५ ; सरासरी: ५०.५० ; शतकं: २ ; अर्धशतकं: १

१९८४-८५ पाकिस्ताविरूद्ध-पाकिस्तानमध्ये
एकूण धावा: १२० ; सरासरी: ४०

१९८४-८५ इंग्लंडविरूद्ध-भारतात
एकूण धावा: १४० ; सरासरी: १५.५६ ; अर्धशतकं : १

१९८५-८६ श्रीलंकेविरूद्ध-श्रीलंकेत
एकूण धावा: १८६ ; सरासरी: ३७.२० ; अर्धशतकं: २

१९८५-८६ ऑस्ट्रेलियाविरूद्ध-ऑस्ट्रेलियात
एकूण धावा: ३५२ ; सरासरी: ११७.३३ ; शतकं २

१९८६ इंग्लंडविरूद्ध-इंग्लंडमध्ये
एकूण धावा: १७५ ; सरासरी: २९.१७ ; अर्धशतकं: १

१९८६ ऑस्ट्रेलियाविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २०५ ; सरासरी: ५१.२५ ; शतकं: १ ; अर्धशतकं: २

१९८६-८७ श्रीलंकेविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २५५ ; सरासरी: ८५ ; शतकं: १ ; अर्धशतकं: १

१९८७ पाकिस्तानविरूद्ध-भारतात
एकूण धावा: २९५ ; सरासरी: ४९.१७ ; अर्धशतकं: ३

गावसकर एकूण १२५ कसोटी सामने खेळला. त्यातल्या २१४ डावात १६ वेळा नाबाद राहून त्याने ५१.१२ धावांच्या सरासरीने १०,१२२ धावा फटकावल्या. ह्यात २३६ नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने एकूण ३४ शतकं आणि ४५ अर्धशतकं ठोकलेली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा जगातला सर्वात पहिला फलंदाज म्हणून गावसकरच्या नावाची नोंद इतिहासात झालेय. तसंच डॉन ब्रॅडमन ह्यांचा २९ शतकांचा बरीच वर्ष अबाधित असलेला विक्रम मोडणारा पहिला फलंदाज म्हणूनही गावसकरचे नाव इतिहासात नोंदले गेलंय.

वेगवेगळ्या संघांविरुद्धची त्याची सरासरी अशी आहे.
वेस्ट-इंडिज: ६५.४५
इंग्लंड: ३८.२०
पाकिस्तान: ५६.४६
ऑस्ट्रेलिया: ५१.६७
न्युझीलंड: ४३.४०
श्रीलंका: ६६.६७

सुनीलने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १०८ झेल घेतलेले आहेत.

सुनीलने १०८ एकदिवसीय सामन्यातल्या १०२ खेळीत १४ वेळा नाबाद राहात ३५.१३ च्या सरासरीने ३०९२ धावा काढल्या आहेत. ह्यामध्ये त्याचे फक्त एक शतक आणि २७अर्धशतकं आहेत. एकदिवसीय सामन्यात सुनीलने एकूण २२ झेल घेतलेले आहेत.

प्रत्यक्ष खेळाडु म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर तो दूरचित्रवाणीवर क्रिकेट समालोचक म्हणून वावरतोय. तसेच वृत्तपत्र-मासिकातून स्तंभलेखन देखिल करतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ , तसेच आंतर्राष्ट्रीय क्रिकेट समितीवरही मानाची पदं भुषवलेली आहेत. त्याच्या बहारदार क्रिकेट कारकिर्दीचे कौतुक म्हणून भारत सरकारने त्याला पद्मभूषण देऊन सन्मानित केलंय.

क्रिकेट जगतातसनीह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या लिटिल मास्टरच्या वयाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. आपण त्याला दीर्घायुरोग्य चिंतूया.
जीवेद्शरद: शतम्‌!

संकलक: प्रमोद देव

सर्व माहिती महाजालावरून साभार!

Print Page

५ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

प्रसिध्दित झळकणार्‍या व्यक्ती ऐवजी ज्यांनी त्याच्या पेक्षा जास्त मोलाची कामगीरी केली असून प्रसिध्दी मिळाली नसणारे एकनाथ सोलकर, बापू नाडकर्णी, रमाकांत देसाई वगैरे खेळाडूना योग्य प्रसिध्दी मिळवून देता येईल का ?

अनामित म्हणाले...

रानडेसाहेब, सुनील गावसकरची बरोबरी निदान आपण म्हणता ते खेळाडू कधीच करू शकत नाहीत. पण वैयक्तिकरित्या एकनाथ सोलकर,बापू नाडकर्णी,रमाकांत देसाई वगैरे खेळाडू त्यांच्या गुणवैषिष्ठ्यासह मला आवडतात आणि भविष्यात त्यांच्याबद्दलचे संकलनही मी नक्कीच सादर करणार आहे.
खरं तर मी सुनील गावसकरबद्दल लिहितांना जाणता-अजाणताही त्याची तुलना दुसर्‍या कोणत्याही खेळाडुशी केलेली नाहीये; त्यामुळे गावसकर महान आहे म्हणून इतर लहान आहेत असे कुठेही सूचित झालेले नाहीये. पण आता इथे सांगतो की क्रिकेटच्या खेळात सलामीचा फलंदाज म्हणून गावसकर इतकी उंची अजून तरी दुसरा कुणी गाठू शकलेला नाहीये.
असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

क्रिकेट बद्दल तशी मी अज्ञानीच आहे पण लहानपणी सुनील गावसकर यांचंच नाव खूप ऐकलं होतं. त्यांच्या जन्मानंतरची कथा माहित नव्हती. त्यांना लिटल मास्टर आणि सनी म्हणायचे असं म्हणायचे हे माहित होतं. ’प्रेमाची सावली’ या मराठी चित्रपटात त्यांनी नायकाची छोटीशी भूमिका केली होती. एक क्रिकेटपटू चित्रपटातील नायकाच्या भुमिकेत कसा दिसेल, ह्या कुतुहलापोटी मी तो चित्रपट पाहिला होता.

सुधीर कांदळकर म्हणाले...

लेख वाचतांना जुन्या स्मृति जाग्या झाल्या. आंकडेवारी दिली हें उत्तमच. पण आंकडेवारीपलीकडेहि कांहींतरी आहे बरें कां. पुढिळ लेखांत तें येईल अशी आशा आहे. फक्त दोन रणजी सामन्यांत सामान्य मध्यमगती गोलंदाजी खेळल्यावर प्रथमच खर्‍याखुर्‍या वेगवान गोलंदाजीला परदेशीं सामोरें जातांना तो डगमगला नाहींच वर ती गोलंदाजी त्यानें मनसोक्त फोडून काढली.

७४ सालीं वानखेडेवरच्या पहिल्या सामन्यांत समोर पहिल्या डावांतल्या सहाशेचा डोंगर असतांना, त्यानें ८६ धावा ज्य आक्रमतेनें काढल्या ती आक्रमकता लाजबाब होती. भारत्याच्या पहिल्या ५० धांवांत गावस्करचे १२ चौकार होते.

आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

Ameya Girolla म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.