सोमवार, ३० नोव्हेंबर, २००९

विज्ञान अणि चमत्कार

भानामतीचे खेळ कोण करते? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का ? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो ? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतिक शास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत? विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तानवनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित ते घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे, अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.

जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा आंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणार्‍यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.

पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात, परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.

ग्रंथपरिचय –निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक


लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२३८३९९ वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.


Print Page

६ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

शशिकांतजी, शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे. हे थोडे श्री गळतगे ह्यांनीच दिलेल्या उदाहरणासहित असले तर जास्त परिणाम कारक होईल. अजून ही फार वेळ गेलेला नाही, योग्य जागी उदाहरण टाकण्याचा प्रयत्न करुन पाहा.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

व्हीके रानडेकाकांच्या मताशी सहमत. अशी पुस्तके सर्वांनीच वाचावयास हवी.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

व्ही के जी, कांचन जी,
जरूर. मात्र त्यासाठी मला संपादकानी मूळ लेखकाचे म्हणणे सविस्तर उधृत करायला परवानगी दिली तर मी अनेक संदर्भ देऊ इच्छितो.

अनामित म्हणाले...

ओकसाहेब, आपण इथे प्रतिसादात सविस्तर लिहू शकता. त्यामुळे आमचीही जिज्ञासा शमेल. अर्थात त्यासाठी मूळ लेखक आणि प्रकाशकाची परवानगी घेतलीत तर बरे होईल.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

शशिकांतजी, शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे. हे थोडे श्री गळतगे ह्यांनीच दिलेल्या उदाहरणासहित असले तर जास्त परिणाम कारक होईल....

मित्र हो,
लेखकाची परवानगी व अन्य लेखनासाठी मिपावर नवा धागा पहा.
वरील कथनाबाबत लेखक म्हणतात -
"ती नाळ “माणूस” या प्राण्यामुळे जोडली गेली आहे.
मनुष्य हा भौतिक विश्वातील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. उत्क्रांतीचा परमोच्च बिंदू आहे. त्याला स्थूल शरीर आहे. पण या स्थूल शरीरात त्याला वासना, मन, बुद्धी व आत्मा हेही आहेत. त्यामुळे भौतिक जीवन जगण्यासाठी त्याला ज्या प्रमाणे भौतिक (शारीरिक) गरजा भागवाव्या लागतात, त्याचप्रमाणे त्याला वासनात्मक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक जीवन जगण्यासाठी त्याला त्या पातळीवरील गरजा ही भागवल्या पाहिजेत. त्या गरजा भागवल्या नाहीत तर तो पूर्ण अर्थाने ‘मनुष्य’ म्हणून जगू शकणार नाही. पण या गरजा यथायोग्य रीतीने भागवण्यासाठी त्याला विज्ञानाची कास धरली पाहिजे. अन्यथा त्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते, उदा.स्थूल शरीराच्या भौतिक गरजा शास्त्रीय ज्ञानाने भागवल्या नाहीत तर त्याचे शरीर अकार्यक्षम (रोगी) बनेल. कदाचित ते जीवंत सुद्धा राहू शकणार नाही. त्यासाठी त्याला आपल्या भावनिक मानसिक, नैतिक आणि अध्यात्मिक आरोग्यासाठी सूक्ष्म (अदृश्य) देहाच्या अतींद्रीय पातळीवरील गरजा भागवल्या पाहिजेत. त्यासाठी त्याला वासनादेह (लिंगदेह) मनोदेह, बुद्धिदेह व आत्म्याचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे. हे सूक्ष्म देह स्थूल देहाप्रमाणे दृष्य नसल्यामुळे – ते अदृष्य पातळीवरील देह असल्यामुळे – त्यांच्या रोगाकडे मनुष्य नेहमीच दुर्लक्ष करीत असतो. ते देह जणु अस्तित्वातच नाहीत अशा थाटात तो वावरत असतो! त्यामुळे भावनिक, मानसिक, नैतिक व अध्यात्मिक क्षेत्रात (पातळीवर) त्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या दुर्लक्षामुळे अपरिमित नुकसान होत असते. ते परिणाम त्याला दिसत नाहीत, म्हणून चुकत नाहीत. ते त्याला भोगावेच लागतात. अतींद्रीय विज्ञानाच्या माहितीच्या/ज्ञानाच्या अभावामुळे ते त्याला भोगावे लागतात. हे लक्षात ठेवले पाहिजे.
जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमांच्या शोधालाच ‘विज्ञान’ म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’ आहे. वैज्ञानिक (वैज्ञानिकांची असली) तरी ती अंधश्रद्धाच असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य आपल्याला दिसत नाही म्हणून ‘प्रकाश’च अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणार्यांाना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात, इतरांना सुद्धा कसे पहायला मिळतात, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते. त्यामुळे अतींद्रीय पाताळीवरील त्या देहांच्या शास्त्रीय ज्ञानाची गरज मानवाच्या सर्वांगिण (अध्यात्मिक) विकासासाठी, भौतिक देहाच्या ज्ञानाइतकीच, किंबहुना त्याहून जास्त कशी आहे हे कोणास पटण्यासारखे आहे.
अतींद्रीय जगाचे अस्तित्व व मानवी जीवनातील त्याचे महत्व तात्विक दृष्टीनेसुद्धा भौतिक शास्त्रज्ञांना स्वतः त्यांचे भौतिक शास्त्रीय सिद्धांतच कसे दाखवून व पटवून देतात, हे ही क्वाँटम सिद्धांताच्या चर्चेतून व विवरणातून दाखवून दिले आहे. त्यामुळे भौतिक शास्त्रालासुद्धा शेवटी अध्यात्मशास्त्रालाच तात्विक दृष्ट्या कसे येऊन मिळावे लागते, हे कळून येते. कारण मुळात भौतिक विश्व आध्यत्मिक (ब्रह्म) तत्वातूनच निर्माण (विकसित) झालेले असल्यामुळे, म्हणजे त्याला आध्यात्मिक तत्वांचेच अधिष्ठान असल्यामुळे, त्या तत्वाचे सहाय्य घेतल्याखेरीज भौतिक विश्व तत्वतः अर्थपुर्णच होणार नाही - शास्त्रीय दृष्ट्या सिद्धच होणार नाही.
भौतिक विश्वाचे हे ‘शास्त्रशुद्ध तात्विक ज्ञान’ म्हणजे सर्व विज्ञानाचे विज्ञान असलेल्या ‘अध्यात्म विज्ञानाचे शास्त्रशुद्ध ज्ञान’च असून तेच ज्ञान मानवाच्या व भौतिक विश्वाच्या निर्मितीच्या ‘चमत्कारा’चा या विश्वरुपी (ईश्वरी) नाटकाचा-या ईश्वरी मायेचा-उलगडा करू शकते. किंबहुना विश्व म्हणजेच एक ईश्वरी नाटक आहे, ईश्वरी माया आहे, हे सुद्धा ते ज्ञानच दाखवून देऊ शकते. त्या ज्ञानाचे महत्व किती सांगावे तितके थोडेच आहे. पण भौतशास्त्रावर (व भौतवादावर) अपरंपार विश्वास असणाऱ्यांसाठी ते थोडेतरी सांगितले पाहिजे, म्हणून हा ‘थोडा’ प्रयत्न केला आहे. ....इत्यलम्.

Unknown म्हणाले...

भुतं आहे का,नाही?