बुधवार, २५ नोव्हेंबर, २००९

अग्निमिळे






फांदीवर फांदी
घासली गेली अन्
तू कवेत आलास
माणसाच्या.

उग्र भयंकर अक्राळविक्राळ
तुझ्या रूपाची
धास्ती असलेले
सहजपणे
सलगी करू लागले
तुझ्याशी सखा बनून.

तुझ्या स्तुतीची
कवने रचली,
तू शांत राहावा
म्हणून हवने दिली.

नव्या युगातील
मानवाला
तुझी तितकीशी
भिती वाटत नाही,
कदाचित
म्हणूनच तो
तुझी स्तुती करत नाही
कृतज्ञता म्हणून पणती लावत नाही.

पण ...
पण मला माहीत आहे
तुझा त्याग.

रौद्ररुप त्यागून
तू सौम्य झालास
म्हणून तर
इतकी प्रगती झाली मानवाची.

अग्रे नयति इति अग्नी.

म्हणूनच मी तुझी पुन्हा स्तुती करत आहे...

अग्निमिळे पुरोहितम...

कवि: अवलिया

Print Page

1 टिप्पणी:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

छान आहे! एक प्रकारची अग्निस्तुतिच म्हणायची.